Sindhudurg: इन्सुली येथे गोवा बनावटीची अडीच लाखांची दारू पकडली, एकजण ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 3, 2024 08:24 PM2024-05-03T20:24:23+5:302024-05-03T20:25:34+5:30
अजित दळवी बांदा : बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ...
अजित दळवी
बांदा : बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ५८ हजारांची दारू व पाच लाखांची कार असा एकूण ७ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी रात्री उशिरा इन्सुली येथे दारू फॅक्टरीच्या परिसरात करण्यात आली. गोपाळ सुरेश गावडे (रा. नेनेवाडी चाैकुळ) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना गाडी क्रमांक (एमएच ०७, क्यू ८६८५)ची तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ४५ कागदी पट्ट्याचे बॉक्स असा साठा मिळून आला. याप्रकरणी गावडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. यात २ लाख ५८ हजारांच्या दारूसह ५ लाखांची गाडी असा एकूण ७ लाख ५८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, तानाजी पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजित शिंदे, दीपक वायदंडे आदींनी केली. अधिक तपास तानाजी पाटील करत आहेत.