प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध तोडून टाक, सांगूनही ऐकत नसल्याने पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:39 AM2023-05-11T11:39:19+5:302023-05-11T11:44:38+5:30

ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. आरोपी पती, त्याचा मित्र गजाआड 

Goa woman killed by her husband in Dodamarg, | प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध तोडून टाक, सांगूनही ऐकत नसल्याने पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध तोडून टाक, सांगूनही ऐकत नसल्याने पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

googlenewsNext

दोडामार्ग : प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध तोडून टाक, असे वारंवार सांगूनही पत्नी ऐकत नसल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला गोव्यातून घोटगेवाडीत आणून तिचा स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. ही घटना मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेचे नाव विशिता विनोद नाईक (३०, रा. वास्को गोवा) असे आहे.

या प्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी तिचा पती विनोद मनोहर नाईक (४०, मूळ रा. बेलबाय वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट म्हापसा-गोवा) व त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले (२७, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यांना पहाटेपूर्वीच अटक केली.

घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्या खाली अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह तेथील ग्रामस्थ दिनू मणेरीकर यांना मंगळवारी दिसला. पोलिसांना ही माहिती कळताच पोलिस निरीक्षक हृषीकेश अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साेळंखे आदींनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली.

पाेलिसी खाक्या दाखविताच गुन्हा कबूल

महिलेच्या पेहरावावरून ही महिला गोव्यातील असावी, असा अंदाज व्यक्त करीत त्यादृष्टीने तपास सुरू केला. म्हापसा पोलिस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकराने केली असल्याचे समजले. त्यानुसार तिच्या प्रियकराकडे चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या वर्णनावरून तो मृतदेह विशिताचाच असल्याचा अंदाज त्याने वर्तवीत तिचा पती विनोदवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी विनोदला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.

मित्राच्या मदतीने गळा आवळून संपविले

आपले सन २०१५ साली विशिताशी लग्न झाले. त्यानंतर दोन वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. मात्र, सन २०२० ला विशिताचे तिच्या माहेरच्या गावातीलच एकाशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. तिथपासून ती माझ्यापासून विभक्त राहत होती. घटस्फोटापर्यंत प्रकरण आले होते. विभक्त राहत असली तरी ती मला भेटत असे,

यादरम्यान तिला तिचे प्रियकराशी असलेले संबंध कायमचे संपविण्याबाबत समज दिली. मात्र, ती ऐकत नसल्याने गोड बोलून तिला दोडामार्गमध्ये आणून नंतर घोटगेवाडीत नेऊन आपण आपल्या मित्राच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास विशिताचा गळा आवळून खून केल्याची कबुली पती विनोद नाईकने दिली.

Web Title: Goa woman killed by her husband in Dodamarg,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.