काँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:19 IST2020-07-14T15:16:36+5:302020-07-14T15:19:38+5:30

काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. तो पैशांवर पक्ष नाही. काँग्रेस पक्षालाही आगामी काळात चांगले दिवस येतील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला.

Good days for Congress in future: Gawde | काँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे

काँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे

ठळक मुद्देकाँग्रेसला आगामी काळात चांगले दिवस : गावडे प्राथमिक शिक्षक भवनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

देवगड : काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. तो पैशांवर पक्ष नाही. काँग्रेस पक्षालाही आगामी काळात चांगले दिवस येतील, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला.

देवगड तालुका काँग्रेसची बैठक येथील प्राथमिक शिक्षक भवनात पार पडली. या बैठकीत बाळा गावडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी काँग्रेस नेते साईनाथ चव्हाण, ईर्शाद शेख, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, चिटणीस अरूण टेंबुलकर, सुशील राणे, सुगंधा साटम, तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवक तालुकाध्यक्ष किरण टेंबुलकर, रवींद्र खाजणवाडकर आदी उपस्थित होते.

गावडे म्हणाले, आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा तयारीला लागा. कार्यकर्त्यांनी हतबल होऊ नये. येणारे दिवस हे काँग्रेस पक्षासाठी चांगले आहेत, असेही ते म्हणाले.

 

Web Title: Good days for Congress in future: Gawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.