दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 6, 2023 12:54 PM2023-10-06T12:54:25+5:302023-10-06T12:55:01+5:30

इन्सुली एक्साईजच्या पथकाची कारवाई

Goods worth 14 lakhs including Goa-made liquor seized in Dodamarg, one arrested | दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

googlenewsNext

सिंधुदुर्ग : दोडामार्ग–तिलारी नगर मार्गावर इन्सुली एक्साइजच्या पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई केली. यात ३ लाख ८८ हजार ८०० रुपयांच्या दारुसह १३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ईश्वर रणजित सिंग (३१, रा. मांद्रे गोवा) याला ताब्यात घेण्यात आले. 

ही कारवाई शुक्रवारी पहाटे ३.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कारवाई प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदिप रास्कर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली.

यामागे मोठी साखळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणावर चोरट्या दारूची वाहतूक होत असते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात दारू पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून दारूची वाहतूक होत असते. काही वेळा पोलिस यंत्रणेला याबाबतची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर कारवाई होते. बहुतांश वेळा ही दारू एजंटाकरवी त्या त्या भागात पोहोचते. यामागे मोठी साखळी असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Goods worth 14 lakhs including Goa-made liquor seized in Dodamarg, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.