बनावट कागदपत्र जोडून स्विमिंगचा ठेका मिळवला - निशांत तोरसकर

By अनंत खं.जाधव | Published: May 9, 2023 06:46 PM2023-05-09T18:46:28+5:302023-05-09T18:46:46+5:30

सावंतवाडीत स्विमिंग पूलमध्ये युवकाचा मृत्यू, मुख्याधिका-यांसह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Got swimming contract by adding fake document - Nishant Toraskar | बनावट कागदपत्र जोडून स्विमिंगचा ठेका मिळवला - निशांत तोरसकर

बनावट कागदपत्र जोडून स्विमिंगचा ठेका मिळवला - निशांत तोरसकर

googlenewsNext

सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये झालेल्या युवकाच्या मृत्यूस नगरपरिषद चे मुख्य अधिकारीच जबाबदार आहेत. संबंधित ठेका घेणारा ठेकेदार हा प्रशिक्षित नसताना तसेच कागदपत्रा मध्ये तफावत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांनी त्या संस्थेला ठेका दिला कसा असा सवाल सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केला आहे.जर एखादा प्रशिक्षित व्यक्ती असता तर ग्लेन डिसोजा ला आपला प्राण गमवावा लागला नसता असा दावा तोरसकर यांनी केला आहे.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तोरसकर म्हणाले,सावंतवाडी नगर पालिकेच्या माध्यमातून स्विमिंग पूलचा ठेका सावंतवाडीतील नेवगी नामक तरूणाला देण्यात आला होता. हा ठेका देत असतना  ठेकेदाराने बनावट कागदपत्रे जोडून हा ठेका घेतला आहे आज ही कागदपत्र ऑनलाइन उपलब्ध आहेत.याबाबत मी स्वता मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते पण त्या तक्रारीची साधे स्पष्टीकरण अथवा चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे झालेल्या प्रकार हा मुख्याधिकारी याच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असे उघडपणे दिसत आहे.

त्यामुळे जर कोण सांगत असेल कि त्याला अस्थमा होता किवा अन्य आजार होते.हे सर्व खोटे असून ग्लेन यांचा मृत्यू हा बुडून झाला असे शवविच्छेदन अहवालात आले आहे.मग तुम्ही चुकीची माहिती का पसरवता आणि आतापर्यंत पोलीसांनी कुणाच्या दबावाखाली येऊन चौकशी थांबवली आहे.असा सवाल ही तोरसकर यांनी केला आहे.यात मुख्याधिकारी यांची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे पण बनावट कागदपत्र जोडली त्यात ठेकेदार दोषी आहे.त्याशिवाय स्विमिंग साठी येणाऱ्या युवकाची पुरेशी काळजी घेण्यात आली नाही त्यामुळे ग्लेन चा मृत्यू झाला त्यामुळे या ठेकेदार आणि इतर प्रशिक्षण देणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी तोरसकर यांनी केली.

ठेकेदाराने जी कागदपत्र जोडली आहेत ही कागदपत्र बोगस आहेत एका कृषी अधिकाऱ्याचा अनुभवाचा दाखला जोडला आहे तसेच एका रिसॉर्ट मध्ये असलेल्या स्विमिंग पूल मध्ये प्रशिक्षण दिल्याचा दाखला जोडला आहे हा सर्व प्रकार म्हणजे फसवणूक आहे त्यामुळे त्या कागदपत्राची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणी आम्ही आतापर्यंत पोलीस अधीक्षक यांना भेटलो असून त्यानी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ही तोरसकर यांनी केली आहे.

Web Title: Got swimming contract by adding fake document - Nishant Toraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.