आरोग्य यंत्रणेवर सरकारचा धाक नाही
By admin | Published: June 26, 2015 10:44 PM2015-06-26T22:44:05+5:302015-06-27T00:21:55+5:30
राज ठाकरे : मंत्री उद्घाटनांत मग्न; राज्यातील रुग्णालयांची दुरवस्था
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये दिसून आली. मंत्री येऊन केवळ इमारतीची उद्घाटने करीत सुटले आहेत; पण येथे सुविधा आहेत कुठे? कोट्यवधीची औषध खरेदी करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारचा यंत्रणेवर धाक राहिला नसल्याने रुग्णालयांची अवस्था बिकट बनली आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील समस्या जाणून घेतल्या. जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेत रुग्णालयाच्या सद्य:स्थिती व उपलब्ध आस्थापनाविषयी माहिती जाणून घेतली.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून पैसे उकळले जातात. रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे पाठविले जाते. खासगी डॉक्टरांकडून कोणती औषधे व उपचार केले याचे कोणतेही पुरावे (कागदपत्र) दिले जात नाहीत; मात्र दामदुप्पट बिल घेतले जाते. अशा व्यथा मांडल्या. यावेळी राज ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला समज देत यापुढे रुग्णांकडून पैसे लुटण्याचे थांबवा, चांगली सेवा द्या. रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबत दक्षता घ्या अशा सूचना केल्या. याबाबत शासनाला अहवाल दिला आहे; परंतु अद्याप ही पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यात अडचणी होत असल्याचे यावेळी सांगितले,
रिक्त पदांमुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणी
जिल्हा शल्य चिकित्सक संजय वंदाळे यांनी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रमुख तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ ची सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत.