कुडाळात ‘गोविंदा रे गोपाळा’

By admin | Published: September 7, 2015 09:41 PM2015-09-07T21:41:12+5:302015-09-07T21:41:12+5:30

रसिक प्रेक्षकांची गर्दी : राजकीय, सामाजिक संस्थांनी उभारल्या दहीहंड्या

'Govinda Ray Gopala' in Kudal | कुडाळात ‘गोविंदा रे गोपाळा’

कुडाळात ‘गोविंदा रे गोपाळा’

Next

कुडाळ : श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यानिमित्त कुडाळ शहरात आयोजित केलेल्या विविध राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या दहीहंडी उत्सवातील हंड्या गोविंदा पथकांनी उत्साहात गोविंदा रे गोपाळा, बोल बंजरंग बली की जयच्या घोषात फोडल्या. यावेळी रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालानिमित्त कुडाळात ठिकठिकाणी दहीहंडीचे आयोजन केले होते.
कुडाळ तालुका विभागीय व शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दहीहंडीचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, लोकसभा युवक मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष रूपेश पावसकर, कुडाळचे उपसरपंच विनायक राणे, युवक शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य संध्या तेरसे, रेखा काणेकर, राकेश नेमळेकर, राकेश कांदे, सिद्धेश बांदेकर, प्रवीण काणेकर, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने आयोजित दहीहंडीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुधा शारबिद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, संजय भोगटे, युवा सेना अध्यक्ष मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, नागेश नाईक, सुशील चिंदरकर, संदेश पडते, विनोद शिरसाट तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते. तसेच कुडाळमध्ये हेल्प ग्रुप कुडाळ, स्वाभिमानी कामगार संघटना व संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीनेही दहीहंडीचे आयोजन शहरात केले होते.
जय वेतोबा दहीहंडी पथक वेताळबांबर्डे, आनंदवाडी दहीहंडी पथक वेंगुर्ला, जयभीम युवक मंडळ कुडाळ, जय गणेश मित्र मंडळ एम.आय.डी. कुडाळ, ब्राह्मण देव ग्रुप डिगस, तात्या पवार मित्र मंडळ साळगाव, आदी दहीहंडी पथकांनी थर रचले. यातील काही पथकांनी पाच ते सहा थर रचून सलामी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Govinda Ray Gopala' in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.