Sindhudurg: दांडेलीत आढळला चक्क गवत्या साप
By अनंत खं.जाधव | Published: September 8, 2023 04:13 PM2023-09-08T16:13:06+5:302023-09-08T16:13:57+5:30
सावंतवाडी : दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा ...
सावंतवाडी : दांडेली येथील चंद्रकांत विष्णु गावडे यांच्या घराच्या अंगणात एका कोपऱ्यात हिरव्या रंगाचा गवत्या साप दिसला. गवत्या हा आशिया खंडात मिळणारा बिनविषारी साप मानला जात त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
गवत्या सापाला विशेष महत्त्व असून इंग्रजीत ग्रीन किलबॅक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो. गवत्या साप दिल्यानंतर त्याला सुखरुपपणे पकडून सर्पमित्र महेश राऊळ यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले.
गवत्या साप इतर सापापेक्षा वेगळा साप आहे. नेहमीपेक्षा हा वेगळा साप असल्याने. हा साप तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ आढळून येत असतो. हा जास्त कुठेही आढळून येत नाही कारण त्याचा रंग हिरवा असल्यामुळे आणि त्याचा अधिवास हा हिरव्या झाडाझुडपात गवतात असल्यामुळे तो जास्त आढळून किंवा दिसून येत नाही. क्वचित तो मानवी वस्तीत आढळून येतो.
गवत्या साप कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. हा साप जास्त करून गवतात वास्तव्यास असतो.