पर्यटन व फळेझाड लागवडीस सिंधुदुर्गात भरपूर वाव

By admin | Published: June 24, 2017 01:20 PM2017-06-24T13:20:06+5:302017-06-24T13:20:06+5:30

आयुक्त जगदीश पाटील यांचे आढावा बैठकीत मत

Great scope in tourism and fruit plantation in Sindhudurg | पर्यटन व फळेझाड लागवडीस सिंधुदुर्गात भरपूर वाव

पर्यटन व फळेझाड लागवडीस सिंधुदुर्गात भरपूर वाव

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. २४: निसर्गसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व फळझाड लागवडीत भरपूर वाव आहे. या दोन्ही योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिकारी वर्गाने समन्वयाने कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे असे मत कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळझाड लागवड, पर्यटन, खनिकर्म, भूसंपादन, जिल्हा नियोजन समिती आदी बाबत सविस्तर आढावा आयुक्त जगदीश पाटील यांनी आढावा सभेत घेतला. जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, निता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबाथोरात आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चौपदरी रस्ता अंतर्गत भूमिसंपादनबाबत झालेली कार्यवाही, फळझाड अंतर्गत यापूर्वी झालेली फळझाड लागवड यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट, खनिकर्म अंतर्गत रॉयल्टी वसुली, भूमिसंपादन लाभधारकांनामोबदला वितरण, पर्यटन प्रकल्पांची कार्यवाही आदी बाबत विभागीय आयुक्त पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.

Web Title: Great scope in tourism and fruit plantation in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.