साखरपुड्याच्या आनंदावर अपघातामुळे शोककळा

By Admin | Published: February 10, 2017 12:09 AM2017-02-10T00:09:52+5:302017-02-10T00:09:52+5:30

साखरपुड्याच्या आनंदावर अपघातामुळे शोककळा

Grief is due to an accident on the joy of sugarcane | साखरपुड्याच्या आनंदावर अपघातामुळे शोककळा

साखरपुड्याच्या आनंदावर अपघातामुळे शोककळा

googlenewsNext


सिंधुदुर्ग : निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना, बुधवारी सकाळी आलेला एक फोन पार्ल्यातील शिवाजीनगर परिसर शोककळा पसरविणारा ठरला. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील खानू येथे मोटार धडकून झालेल्या अपघातात या परिसरातील सात तरुण मृत्युमुखी पडले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताने संबंधितांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार अक्षरश: हादरून गेला.
या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रशांत गुरव (२८) याच्या बहिणीचा येत्या रविवारी साखरपुडा असल्याने त्याची तयारी सुरू होती. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने, आनंदाचे रूपांतर शोकामध्ये झाले. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.
प्रशांत गुरव हा फिल्मसिटीमध्ये मेकअपमन होता. सचिन शिपिंग कंपनीत तर निहार कोटियन मेट्रो स्टेशन आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. केदार तोडकर महाविद्यालयात शिकत होता, तर अन्य चौघेजण खासगी कंपनीत काम करीत होते. गोव्याला फिरायला जायचे ठरल्यानंतर, ते मालाडमधून आलिशान कारमधून निघाले होते. (प्रतिनिधी)
प्रशांत गुरवचे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे असून, येत्या रविवारी त्याची बहीण प्रणाली हिचा साखरपुडा होणार होता. त्यामुळे त्याने त्याची तयारी जोरात केली होती. साखरपुड्यासाठी छापलेल्या पत्रिका आसपासच्या परिसरामध्ये वाटण्यात आल्या होत्या. गोव्यात जाण्यापूर्वी सावंतवाडी येथे राहात असलेल्या चुलत बहिणींना पत्रिका देऊन पुढे जायचे, असे त्यांचे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
वैभवच हरवले
वैभव मनवे हा घरातील एकटाच कर्ता पुरुष होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्या आईने त्याला धुणीभांडी करून मोठे केले. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यानंतर, आज वैभवच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला.
दु:खाचा डोंगर
केदार तोडकरचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्याच्यामागे आईवडील, दोन बहिणी असा त्याचा परिवार आहे. पार्ल्यात केदारच्या वडिलांचे एक छोटे दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. केदारच्या निधनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Grief is due to an accident on the joy of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.