जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:33 PM2019-04-30T16:33:41+5:302019-04-30T16:34:56+5:30

जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरूद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

In the group of two groups in the battle of Carivade due to land dispute | जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी

जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी

Next
ठळक मुद्देजमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारीपरस्परविरोधी गुन्हा दाखल

सावंतवाडी : जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरूद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. यात अश्विनी अनिल कोलगावकर व प्रणिता कोलगावकर या दोघीही जखमी झाल्या आहेत. प्रणिताच्या हाताला दुखापत झाली असून, अश्विनीचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरीस गेला आहे.

जमीन-जागेच्या वादातून कारिवडे-गावठाणवाडी येथे दोन गटात दांड्याने जोरदार हाणामारी झाली. यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. कोरगावकर कुटुंबीय आपल्या घराशेजारील माती आपल्याच कंपनीच्या बाजूला जेसीबीने टाकत असताना कारिवडेकर कुटुंबीयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ही हाणामारी झाली.

कारिवडे-गावठाणवाडी येथे लता बाबी कोलगावकर हिच्या मालकीची जमीन असून, या जमिनीशेजारी महादेव कृष्णा कारिवडेकर यांची जमीन आहे. आपल्या जमिनीच्या बाजूने खड्डा खोदून त्या ठिकाणी दोघी कोलगावकर महिला माती टाकत असताना पाहून महेश महादेव कारिवडेकर, रवी कारिवडेकर, आनंद बाबाजी कारिवडेकर, मिलन महेश कारिवडेकर, समिती महादेव कारिवडेकर यांनी प्रणिता कोलगावकर, अनिल कोलगावकर व अश्विनी कोलगावकर यांच्यावर दांड्याने हल्ला केला. यात प्रणिता व अश्विनी यांना दुखापत झाली आहे.

या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संबंधित जखमी महिलांनी आपल्याला चार ते पाच पुरुषांनी जमाव करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या जखमींमध्ये आई व विवाहित मुलगी यांचा समावेश आहे. दरम्यान, कारिवडेकर कुटुंबीयांनी आपल्या घरात आपणास येऊन मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: In the group of two groups in the battle of Carivade due to land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.