विकासाला उदासिनतेची कुंपणे...

By admin | Published: October 2, 2014 10:05 PM2014-10-02T22:05:10+5:302014-10-02T22:24:00+5:30

प्रश्न राजापूरचा : फाटकी झोळी ठरतेय बाधक

Growth of fading depression ... | विकासाला उदासिनतेची कुंपणे...

विकासाला उदासिनतेची कुंपणे...

Next

पाचल : राजापूर तालुक्याचा कायापालट करणारे अनेक अतिमहत्त्वाचे प्रकल्प राजापूर तालुक्यात येऊनसुध्दा नियोजनाचा अभाव, तोकडी अभ्यासूवृत्ती, विचारांचा अभाव, राजकीय स्वार्थ या सर्व बाबींमुळे देणाऱ्याने देऊनसुध्दा घेणाऱ्यांची फाटकी झोळी राजापूरच्या विकासाला बाधक ठरली आहे.
राजापूर तालुका एका बाजूला डोंगराळ, तर दुसऱ्या बाजूला सागराच्या पाण्याशी जोडलेला तालुका स्वातंत्र्यानंंतरही म्हणावा तसा विकसित झालेला नाही. कोकणचा कायापालट करणाऱ्या कोकण रेल्वेचे राजापूर रेल्वेस्टेशनवगळता दुसरे रेल्वे स्टेशन नाही. वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प, मोठ्या कष्टाने उभे राहिलेले अर्जुना धरण, पूर्णावस्थेत असलेले त्याचे कालवे, ग्रामीण रूग्णालय असणारे अपुरे कर्मचारी - अधिकारी, रखडलेला जामदा प्रकल्प, संधी असूनही वाढलेली बेरोजगारी, आंबा-काजू बागायतदार, मुंबई-गोवा महामार्ग अशा अनेक मुद्द्यांकडे कोणाचेच लक्ष नसल्याने विकास अजूनही रखडलेलाच आहे.
एका बाजूला डोंगराळ भागाकडे झुकलेल्या राजापूर तालुक्यात सुमारे ६०० कोटींचे अर्जुना धरण आहे. त्याचे डावा-उजवा असे दोन्ही कालवे स्थानिक जनतेची तहान तसेच त्यांची आर्थिक उन्नती करू शकतात. मात्र. राजकीय उदासिनतेमुळे सुरु होवूनसुध्दा त्याचे काम प्रगतीपथावर नाही.पाचल पूर्व भागातील जामदा खोऱ्यातील जामदा प्रकल्प राजकीय अनास्थेमुळे पूर्वपदावर येऊ शकला नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून, काही मृतावस्थेत आहेत.
राजापूर तालुक्याचे पूर्व पश्चिम विभाग करणारा मुंबई-गोवा महामार्ग आजही लुळ्या पांगळ्यागत झाला आहे. महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. यासाठी उपाययोजना राबवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उदासिन प्रशासन, स्वार्थी लोकप्रतिनिधी, अल्पसंतुष्ट कार्यकर्ते आणि आहे त्यावर समाधान मानणारी जनता यामुळे विकास खुंटला आहे. स्वातंत्र्यानंतर राजापूर तालुक्यातील अनेक गैरसोयी दूर झालेल्या नाहीत. विविध प्रकल्पांवर केवळ चर्चा होत आहे. रस्ते, पाणी, आरोग्य या प्रश्नांसोबत काही विकासाभिमुख कार्यक्रम तालुक्यात राबविल्यास त्यातून चांगले निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

अनेक प्रकल्प येवूनही विकासाची दारे बंदच
स्वातंत्र्यानंतर राजापुरची स्थिती जैसे थे
बेरोजगाराची प्रश्न तसाच
ृषी विकासाला चालना हवी
राजकीय अनास्था ठरतेय विकासाला बाधक
ग्रामीण रूग्णालयाचा प्रशन्ही तसाच

Web Title: Growth of fading depression ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.