जीएसटी करप्रणाली सर्वांनाच लाभदायक : किरणकुमार साळोखे

By admin | Published: May 13, 2017 12:05 PM2017-05-13T12:05:52+5:302017-05-13T12:05:52+5:30

कणकवली कॉलेजमध्ये जनजागृती मेळावा

GST tax system is beneficial for all: Kirkkumar Salaoke | जीएसटी करप्रणाली सर्वांनाच लाभदायक : किरणकुमार साळोखे

जीएसटी करप्रणाली सर्वांनाच लाभदायक : किरणकुमार साळोखे

Next

आॅनलाईन लोकमत


सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : आजमितीस विविध प्रकारचे अप्रत्यक्ष कर व्यवहारात आहेत. तथापि आता नविन जीएसटी करप्रणाली लागू होत असल्याने व्यापा-यांबरोबरच ग्राहकांना सुध्दा या करप्रणालीचा लाभ होईल असे मत विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार साळोखे यांनी कणकवली कॉलेजमध्ये आयोजित जनजागृती मेळाव्यात व्यक्त केले

जीएसटी करप्रणाली बाबत विक्रीकर विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत साळोखे बोलत होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्?यक्ष विजयकुमार वळंजू, सचिव नार्वेकर, दयानंद उबाळे, संतोष काकडे, नितीनकुमार पटेल, हर्णे, कामत तसेच व्यापारी उपस्थित होते.
साळोखे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या माध्?यमातून जीएसटी करप्रणालीची सविस्तर माहिती यावेळी दिली. एकाच ठिकाणी नोंदणी, रिटर्न कसे भरावे, पेमेंट कसे करावे, खरेदी वरील क्रेडीट कशा पध्दतीने वापरता येणार या बाबतची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रारंभी विक्रीकर विभागाचे रविकुमार जाधव यांनी प्रास्ताविकात जीएसटीमुळे ह्यएक देश एक करह्ण ही संकल्पना विषद करुन सांगितली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापा-यांसाठी विविध ठिकाणी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Web Title: GST tax system is beneficial for all: Kirkkumar Salaoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.