पालकमंत्र्यांना शिवीगाळ; २० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 15:39 IST2018-03-11T15:39:51+5:302018-03-11T15:39:51+5:30
बेकायदा जमाव करून अर्वाच्च भाषेत पालकमंत्री दीपक केसरकर यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याप्रकरणी

पालकमंत्र्यांना शिवीगाळ; २० जणांवर गुन्हा दाखल
वेंगुर्ले : बेकायदा जमाव करून अर्वाच्च भाषेत पालकमंत्री दीपक केसरकर यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याप्रकरणी वीस जणांवर वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी प्रदीप चंद्रकांत मुळीकसह चौदा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोेलीस उपनिरीक्षक प्रवीण नाईक यांनी याविषयी पोलिसांत तक्रार दिली.
संशयित प्रदीप चंद्रकांत मुळीक (२८, पाल), भरत महादेव ठाकूर (४६, मठ), रवींद्र चंद्रकांत बागायतकर (३७, टांक), महेश दत्ताराम शिरसाट (४४, कुडाळ), अभिषेक गावडे (३०, कुडाळ), कमलेश विलास गावडे (३२, पाल), धीरज विश्वनाथ परब (३४, कुडाळ), विजय कृष्णा सरमळकर (६०, अणसूर), योगेश गुरूदास कोळसुलकर (३०, पाल), गोपाळ फटू गावडे (५०, अणसूर), सहदेव विष्णू फोडनाईक (२७), पांडुरंग शरद कोचरेकर (३२, मोचेमाड), मंदार चंद्रकांत शिरसाट (३२, कुडाळ), संदेश वसंत मोचेमाडकर (३५, मोचेमाड) या चौदाजणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्यावतीने अॅड. राजीव कुडाळकर व अॅड. आनंद गवंडे यांनी काम पाहिले.