अवैध धंद्यावरून पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:45 PM2020-12-20T17:45:28+5:302020-12-20T17:46:09+5:30

थेट पोलिस महानिरिक्षकांना फोन : खास पथके कामाला लावण्याच्या सूचना

Guardian minister Uday samant in Action mode on illegal business | अवैध धंद्यावरून पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये

अवैध धंद्यावरून पालकमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये

Next

सावंतवाडी : अवैध दारू धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यकत केली. तसेच हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे असे म्हणत थेट कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक संजय मोहिते यांनाच भ्रमणध्वनी केला आणि सर्व वस्तूस्थीती त्यांच्या कानावर घातली व मला अ‍ॅक्शन पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे आता तरी पालकमंत्र्यांच्या दणक्याचा उताºयाने अवैध धंद्यावर जरब बसते का, हे बघावे लागणार आहे.


पालकमंत्री उदय सामंत हे शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठकी निमित्त मळगाव येथे आले होते. यावेळी त्यांच्या समोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अवैध धंद्याबाबत कैफियत मांडली. तसेच तालुकाप्रमुख रूपेश राउळ यांनीही निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत अवैध धंदे तसेच टेम्पो चालकाचा खुन तसेच आंबोली घाटात टाकण्यात आलेला मृतदेह यामध्ये अवैध दारू व्यवसायातीलच युवक अडकले आहेत. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनीही चिंता व्यकत केली.


हे सर्व प्रकार गंभीर आहेत. अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे. पोलिसांनी वेगळी यंत्रणा उभी केली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. या अवैध धंद्यांना सहकार्य करणारे कोणीही असूदे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी उत्पादन शुल्क विभागाला जोडीला घ्या आणि कारवाई करा पण हे सर्व थांबणे गरजेचे असून, अल्पवयीन मुले यामध्ये सहभागी होत असतील त्यासारखे वाईट काहि नाही. पोलिसांनी आपली पेट्रोलिंगही वाढवणे गरजेची आहे, असे म्हणत पालकमंत्री सामंत यांनी थेट कोकण विभागाचे पोलिस महानिरिक्षक संजय मोहिते यांना फोन केला.


यावेळी मोहिते यांनी आपण सिंधुदुर्गमध्ये असून, सावंतवाडीमध्ये मला अवैध दारू धंद्याबाबत माहीती मिळाली. मी यावर गंभीर आहे. पण या धंद्यांचा समूळ उच्चटन करण्यासाठी नक्कीच मी पुढाकार घेईन वेगवेगळी पोलिस पथके तयार केली जातील, असे आश्वासन दिले. तसेच आपण याबाबत बैठक घेऊ, असे म्हणत मंत्री सामंत हे ओरोसकडे रवाना झाले.

Web Title: Guardian minister Uday samant in Action mode on illegal business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.