शिकारीला गेलेल्या सैनिकाचा बंदुकीची गोळी सुटून मृत्यू
By admin | Published: February 17, 2017 05:18 PM2017-02-17T17:18:55+5:302017-02-17T17:18:55+5:30
शिवडाव (ता.कणकवली) येथील राजेंद्र गंगाराम बोडेकर (वय 32) या सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून वैभववाडी तालुक्यातील सडुरे-शिराळेच्या जंगलात मृत्यू झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
वैभववाडी(सिंधुदुर्ग), दि. 17 - शिवडाव (ता.कणकवली) येथील राजेंद्र गंगाराम बोडेकर (वय 32) या सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून वैभववाडी तालुक्यातील सडुरे-शिराळेच्या जंगलात मृत्यू झाला. राजेंद्र सुट्टीवर गावी आला होता. फोंडाघाट येथील मित्राला घेऊन गुरुवारी रात्री शिकारीसाठी शिराळे गावातील जंगलात गेला होता. तेथेच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पद्मजा चव्हाण यांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. शिकारीला गेलेल्या सैनिकाचा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाल्यामुळे सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली आहे.