‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
By admin | Published: January 17, 2017 12:06 AM2017-01-17T00:06:04+5:302017-01-17T00:06:04+5:30
दशकपूर्ती सोहळा उत्साहात : ‘लोकमत’ने केले जनतेचे नेतृत्व : राहुल पंडित
रत्नागिरी : ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ‘लोकमत’वर समाजाच्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बदलत्या काळाबरोबर ‘लोकमत’ने परखड पत्रकारिता जोपासून जनतेचे नेतृत्व केले आहे. विविध समस्या वेळोवेळी मांडून जनमनातील आपले स्थान उंचावले आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात केले.
‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त आरोग्य मंदिर येथील कोहिनूर पॅरेडाईजमध्ये हा स्नेहमेळावा रंगला.त्यावेळी नगराध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, सहायक शाखा व्यवस्थापक अतुल कामत, आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये उपस्थित होते.
लोकमतच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळपासूनच मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आमदार राजन साळवी, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मानेज् इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे, रत्नागिरी जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आब्बास मुल्ला, गजानन भरणकर, भूमिअभिलेख कार्यालयाचे निवृत्त उपअधीक्षक सुनील आडिवरेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी, स्वीकृत नगरसेवक प्रशांत साळुंखे, अभिजित गोडबोले, डॉ. दिलीप पाखरे, रंगकर्मी अनिल दांडेकर, योगिता कॉम्प्युटर्सचे पवन जाजू, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व नगरसेवक उमेश कुळकर्णी, जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर, प्रा. प्रभाकर केतकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ पुरवणीचे प्रकाशन
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा दशकपूर्ती सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘कोकणचा टर्निंग पाँईट’ विशेषांकाचे प्रकाशन ग्रामदेवता श्री देव भैरी मंदिरात करण्यात आले.