राज्यातील प्रत्येक शाळेत 'हॅप्पी सॅटर्डे' संकल्पना राबविणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली घोषणा

By अनंत खं.जाधव | Published: February 14, 2024 05:32 PM2024-02-14T17:32:30+5:302024-02-14T17:33:29+5:30

सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप 

'Happy Saturday' concept will be implemented in every school in the state, School Education Minister Deepak Kesarkar made the announcement | राज्यातील प्रत्येक शाळेत 'हॅप्पी सॅटर्डे' संकल्पना राबविणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली घोषणा

राज्यातील प्रत्येक शाळेत 'हॅप्पी सॅटर्डे' संकल्पना राबविणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली घोषणा

सावंतवाडी : शालेय शिक्षण घेताना मुले खुश राहावीत यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला यांचे शिक्षण तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप कार्यक्रमात मुंबई येथून ते ऑनलाईन बोलत होते.

यावेळी एन.सी.आर.टी चे प्राध्यापक टी.पी शर्मा, राधा अतकरी, प्रदीप कुडाळकर, वासुदेव नाईक, अच्युत भोसले, कल्पना बोडके, म.ल. देसाई, कृष्णकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे, प्रवीण राठोड,  प्रियांका देसाई, कैलास चव्हाण, अवधूत मालणकर, महेश चोथे, डॉ. आचरेकर, लक्ष्मीकांत बानते, जयंत भगत, प्रसाद महाले आदि उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती कौतुकास्पद होत्या. विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी यापुढे आपली वाटचाल करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात मुलांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे यासाठी “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेत अंतर्गत दर शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास वगळून संगीत, नाट्य, कला आदी क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 

आगामी काळात पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे. अन्नधान्यात भारत देश स्वयंपूर्ण व्हावा हा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात सर्व देश अन्नधान्याच्या बाबतीत कमी पडले. परंतु भारत देश केवळ शेतकऱ्यांमुळे अडचणीत आला नाही हे गौरवास्पद आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे कृषी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ही मंत्री केसरकर यांनी केले आहे.

यावेळी संचालक कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करतानाच मुलांनी विज्ञान चे ज्या प्रकारे प्रदर्शन थाटले ते सर्वाना प्रेरणा देणारे असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 'Happy Saturday' concept will be implemented in every school in the state, School Education Minister Deepak Kesarkar made the announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.