लोरे येथील घाईगडबडीत उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अजून बंद का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:28 PM2021-01-01T18:28:06+5:302021-01-01T18:33:18+5:30

panchayat samiti Kankavli Sindhudurg- पालकमंत्री, खासदार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत मोठा गाजावाजा करीत लोरे येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरचे उदघाटन झाले. मात्र, लोकार्पण केलेल्या या मोबाईल टॉवरच्या माध्यमातून रेंज मिळत नसेल तर जनतेला त्याचा काय फायदा आहे ?घाई गडबडीत उदघाटन केलेला तो मोबाईल टॉवर का बंद आहे ? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांच्यासह अन्य सदस्यांनी बीएसएनएल दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकारी वाय.जी.भागवत यांना केला.

Is the hastily inaugurated mobile tower at Lore still closed? | लोरे येथील घाईगडबडीत उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अजून बंद का ?

लोरे येथील घाईगडबडीत उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अजून बंद का ?

Next
ठळक मुद्देलोरे येथील घाईगडबडीत उदघाटन केलेला मोबाईल टॉवर अजून बंद का ? कणकवली पंचायत समिती सभेत मनोज रावराणेंसह सदस्यांचा संतप्त सवाल

कणकवली : पालकमंत्री, खासदार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत मोठा गाजावाजा करीत लोरे येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरचे उदघाटन झाले. मात्र, लोकार्पण केलेल्या या मोबाईल टॉवरच्या माध्यमातून रेंज मिळत नसेल तर जनतेला त्याचा काय फायदा आहे ?घाई गडबडीत उदघाटन केलेला तो मोबाईल टॉवर का बंद आहे ? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांच्यासह अन्य सदस्यांनी बीएसएनएल दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकारी वाय.जी.भागवत यांना केला.

 परिपूर्ण माहिती घेऊन उत्तरे द्या. अर्धवट माहिती देऊ नका असेही त्यांना सुनावले. त्यामुळे पंचायत समिती सभेत मोबाईल टॉवरचा मुद्दा चांगलाच गाजला.
सभापती दिलीप तळेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापती दिव्या पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली पंचायत समितीची मासिक सभा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शुक्रवारी झाली . यावेळी दिलीप तळेकर,भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदीवे,प्रकाश पारकर,मंगेश सावंत, स्मिता मालडिकर, सुचिता दळवी तसेच विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

या सभेत लोरे येथील बीएसएनएल टॉवरचा मुद्दा चर्चेत आला. हा टॉवर बंद आहे . मात्र त्याच्या उदघाटनाचा घाट का घातला गेला ? त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य यांना विश्वासात का घेतले नाही ?अजूनही तो टॉवर विजेची जोडणी नसल्याने बंद आहे.काम अपूर्ण असतांना त्याचे उदघाटन कसे केले ? असा सवाल पंचयत समिती सदस्य मनोज रावराणे,मिलिंद मेस्त्री यांनी उपस्थित केला.

याला उत्तर देताना दूरध्वनी केंद्र उपमंडल अधिकारी वाय.जी.भागवत यांनी आपल्या कार्यालयाकडून तो उदघाटन कार्यक्रम आयोजित केला नव्हता , असे स्पष्ट केले. तसेच बीएसएनएलची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कोणतेही उदघाटन सोहळे आम्ही आयोजित करत नाही. असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री, खासदार ,प्रांत अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होते. या मुद्यावरून गटविकास अधिकारी यांनाही धारेवर धरण्यात आले.पालकमंत्री 'प्रोटोकॉल' असल्यामुळे आपण तिथे उपस्थित होतो . असे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित करीत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. असा आरोपही दिलीप तळेकर यांनी केला. कणकवलीत कोविड सेंटर असतांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी दाखल का केले जाते ? असा सवालही यावेळी मिलिंद मेस्त्री यांनी उपस्थित केला. त्याबाबत माहिती घेऊन सांगतो . असे डॉ. संजय पोळ यांनी सांगितले. यासभेत अंगणवाडी सेविका भरती तसेच वीज वितरण कंपनीबाबतच्या समस्या अशा अनेक विषयांवरसुद्धा चर्चा झाली.

तालुक्यात लेप्टोने दोघांचा मृत्यू !

यावर्षी तालुक्यात लेप्टोचे ७१ रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा लेप्टोने मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच लेप्टो, डेंग्यू याविषयी जागृती करण्यात येत आहे. गावागावात डॉक्सीसायक्लिनच्या गोळ्यांचे वाटपही करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी यावेळी दिली.

गावठी आठवडा बाजार सुरू करा !

कणकवली शहरासह अन्य ठिकाणी सुरू असलेले गावठी आठवडा बाजार परत सुरू करावेत. अशी मागणी भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मागवितो असे सांगितले.

Web Title: Is the hastily inaugurated mobile tower at Lore still closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.