सिंधुदुर्गातील हेवाळे गाव लोकराज्य ग्राम

By admin | Published: March 28, 2017 06:03 PM2017-03-28T18:03:40+5:302017-03-28T18:03:40+5:30

पालकमंत्र्यांकडे धनादेश केला सुपूर्द

Havale village of Sindhudurg village | सिंधुदुर्गातील हेवाळे गाव लोकराज्य ग्राम

सिंधुदुर्गातील हेवाळे गाव लोकराज्य ग्राम

Next



आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे हे गाव आता लोकराज्य ग्राम झाले आहे. हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी १३ हजार ७00 रुपयांचा १३७ कुटूंबाचा लोकराज्य वर्गणीचा धनादेश पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, हेवाळे ग्रामस्थ दयानंद गवस, चंद्रकांत सडेकर आदी उपस्थित होते.
स्मार्ट ग्राम योजनेत हेवाळे गावाला १0 लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात १ लाख रुपयांचा प्रथम तर संत तुकाराम वन ग्राम योजनेतही या गावाला ५१ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.

Web Title: Havale village of Sindhudurg village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.