हेवाळेकर प्रकरणाची चौकशी सुरू

By admin | Published: September 9, 2016 10:59 PM2016-09-09T22:59:11+5:302016-09-10T00:39:55+5:30

परमानंद हेवाळेकरांनी मंत्रालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेत चौकशीचे आदेश दिले होते.

Havalekar case inquiry started | हेवाळेकर प्रकरणाची चौकशी सुरू

हेवाळेकर प्रकरणाची चौकशी सुरू

Next

कुडाळ : गावाने वाळीत टाकल्याचे सांगत न्याय मिळविण्यासाठी मंत्रालयासमोर गणेशमूर्ती घेऊन उपोषणाला बसलेल्या परमानंद सावळाराम हेवाळेकर याने प्रशासन दरबारी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत रत्नागिरी पोलिसांचे पथक कुडाळ पोलिसांच्या साह्याने तपास प्रकिया राबवत असून, शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी हेवाळेकर याला घेऊन महादेवाचे केरवडे येथे तपास केला. मात्र, तपासाची नेमकी दिशा सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.दरम्यान, हेवाळेकर याने मंत्रालयासमोर ठेवलेल्या गणेश मूर्तीचे महादेवाचे केरवडे येथे शुक्रवारी पाचव्या दिवशी पोलिस बंदोबस्तात विसर्जन केले.
परमानंद हेवाळेकरांनी मंत्रालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्या आदेशाप्रमाणे रत्नागिरी येथील विशेष पोलिस पथक कुडाळ व महादेवाचे केरवडे परिसरात तळ ठोकून आहे. परमानंद हेवाळेकर याने आतापर्यंत प्रशासनाकडे केलेल्या सर्व (पान ९ वर)

प्रकरणाचा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना
हेवाळेकर यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारअर्ज दिले आहेत. त्यामुळे या तक्रारअर्ज व इतर प्रकरणांचा तपास रत्नागिरीहून आलेले पोलिसांचे खास पथक करीत असून, याबाबतचा अहवाल लवकरच वरिष्ठांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.

Web Title: Havalekar case inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.