‘तो’ टँकर कणकवलीत पकडला

By admin | Published: July 2, 2016 11:20 PM2016-07-02T23:20:01+5:302016-07-02T23:20:01+5:30

करूळ घाटात घडली होती घटना : अपघातात राजापूर तालुक्यातील एक जखमी

'He' caught the tanker in Kankavali | ‘तो’ टँकर कणकवलीत पकडला

‘तो’ टँकर कणकवलीत पकडला

Next

वैभववाडी : करुळ घाटात ओमनीला धडकून पसार झालेला गुजरातचा टँकर कणकवली पोलिसांनी पकडला. या धडकेत राजापूर तालुक्यातील नानारचे हानिफ युसूफ साखरकर (वय ४५) किरकोळ जखमी झाले. ही घटना सकाळी ८.३0 च्या दरम्यान घडली असून टँकर चालक विकेशभाई शिवाजीभाई रठवा (वय ३३, रा. गुजरात) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हानिफ साखरकर ओमनीतून (क्रमांक -एम एच 0८ ; ए जी- 0६६३) करुळ घाटमार्गे कोल्हापूरला निघाले होते. दिंडवणेवाडी येथे गोव्याला जाणाऱ्या टँकरने (क्रमांक जी जे- 0६; ए टी- ४५७५) ओमनीला धडक दिली. त्यामुळे हानिफ साखरकर जखमी झाले. परंतु, जखमीची विचारपूस न करता चालक विकेशभाई रठवा टँकरसह अपघात स्थळावरुन पसार झाला. त्यामुळे जखमी अवस्थेत हानिफ यांनी टँकरचा पाठलाग केला. मात्र, टँकर गोव्याकडे सुसाट निघून गेल्यामुळे हानिफ यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
जखमी हानिफ याच्या माहितीवरुन वैभववाडी पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कणकवलीतील वाहतूक पोलिस प्रकाश गवस यांनी गोव्याकडे निघालेला टँकर अडविला. त्यानंतर दुपारी अडीचनंतर टँकर वैभववाडीत आणला. टँकर चालक विकेशभाई याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक उपनिरीक्षक बी. ए. कदम या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांची सारवासारव कशासाठी?
४ करुळ घाटात सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात ओमनीला धडक देऊन पसार झालेला टँकर करुळ तपासणी नाका आणि वैभववाडी पोलिस ठाण्यासमोरुन गेला. तो कणकवली शहरात पोलिसांनी अडविला. मात्र, मारहाणीच्या भीतीने टँकरचालक अपघात स्थळावरुन पळाला. पोलिस ठाणे माहीत नसल्याने पुढे गेला. अशी सारवासारव पोलिसांकडून केली जात आहे. ही सारवासारव कशासाठी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: 'He' caught the tanker in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.