वाघेरी येथील ग्रामदैवत कुणकेश्वर मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:42 PM2020-02-22T12:42:39+5:302020-02-22T12:52:03+5:30
महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे.
कणकवली : महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे.
कुणकेश्वर भेटीसाठी वाघेरी ग्रामस्थ शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता वाघेरीचे ग्रामदैवत कुणकेश्वर क्षेत्री आले. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत पुन्हा वाघेरीला परतणार आहेत. कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे ग्रामदैवत जवळपास २६ वर्षांनंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधत कुणकेश्वराच्या भेटीसाठी देवगडला आले आहे.
२१ फेब्रुवारी रोजी वाघेरी गावातील लिंगेश्वर पावणादेवी मंदिर येथून श्री देव कुणकेश्वर -देवगडकडे मार्गस्थ होत शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी वाघेरी गावचे देवस्थान पूर्ण दिवस कुणकेश्वर येथे मुक्कामी होते. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून तीर्थस्नानाला सुरुवात झाली. तीर्थस्नानानंतर कुणकेश्वर दर्शन घेऊन देव वाघेरीकडे मार्गस्थ होणार आहेत.
वाघेरी गावचे देवस्थान महाशिवरात्री निमित्ताने कुणकेश्वरक्षेत्री जात असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून या कार्यक्रमात भाविकांसह, वाघेरी गावच्या देवस्थानचे मानकरी व इतर सर्व मानकरी सहभागी यांनी झाले आहेत.