७१ कामगारांवर ५५ हजार नागरिकांचे आरोग्य

By admin | Published: September 18, 2015 10:15 PM2015-09-18T22:15:33+5:302015-09-18T23:16:57+5:30

चिपळूण शहर : ११९१पासून आरोग्य विभागात नवीन भरतीच नाही

Health of 55 thousand people in 71 workers | ७१ कामगारांवर ५५ हजार नागरिकांचे आरोग्य

७१ कामगारांवर ५५ हजार नागरिकांचे आरोग्य

Next

चिपळूण : शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार असून, सन १९९१पासून आरोग्य विभागात सफाई कामगारांची नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे केवळ ७१ कामगार आरोग्य विभागाचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य कसे राखले जाणार, असा सवाल केला जात आहे.चिपळूण शहराची स्वच्छता करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी ८८ कामगारांची नियुक्ती केली होती. या कामगारांच्या मदतीने शहरातील विविध भागांत साफसफाईचे काम केले जात होते. सन १९९१मध्ये शहराची लोकसंख्या अंदाजे ३४ हजार होती. सध्या शहराची लोकसंख्या अंदाजे ५५ हजार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कामगारांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांपैकी १७ कामगार अन्य विभागात बढतीवर काम करत आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार सन १९९१पासून सफाई कामगारांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ७१ कामगारांवरच आरोग्य विभागाचे काम हाकण्याची वेळ आली आहे. शहरातील गटारांची साफसफाई तसेच स्वच्छतेची अन्य कामे सफाई कामगारांकडूनच केली जात आहेत. सण, उत्सव काळातही नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक तेथे याच कामगारांना काम करावे लागत आहे. नवीन भरती न झाल्याने कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांवर ताण पडत आहे. शहरातील गटार कामांचे योग्य नियोजन न झाल्याने काही भागांत पावसाळ्याच्या दिवसात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे काहीवेळा पाणी रस्त्यावर येते. या रोषाला सफाई कामगारांना सामोरे जावे लागत आहे. शहराचा वाढता विस्तार व उभ्या राहणाऱ्या अपार्टमेंट याचा विचार करता सफाई कामगारांच्या संख्येत वाढ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी राजकीय नेते मंडळींनी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Health of 55 thousand people in 71 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.