corona virus-कोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:08 PM2020-03-12T15:08:51+5:302020-03-12T15:10:32+5:30

कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Health Corps Ready, Guardian Ministers Communicate with Officers About Corona | corona virus-कोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

corona virus-कोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

Next
ठळक मुद्देकोरोनाबाबत आरोग्य यंत्रणा सज्ज, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवादव्हिडिओ कान्फरन्सद्वारे उपचाराच्या कार्यवाहीची माहिती

सिंधुदुर्गनगरी : कोरोना व्हायरसबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन कोरोना व्हायरस आजाराच्या प्रतिबंधात्मक व उपचारांच्या कार्यवाहीची माहिती घेतली.

जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, सर्व ठिकाणी या आजाराबाबत जनजागृती बॅनरद्वारे मोहीम राबविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्क्रिनिंग कक्ष, संशयित रुग्ण निरीक्षणासाठी १० खाटांचा कॉरन्टाईन कक्ष, उपचार देण्यासाठी व्हेंटीलेटरसह २५ खाटांचा आयसोलेशन कक्ष, वैद्यकीय सेवा असणाºया खासगी रुग्णालयामध्ये २ खाटा आरक्षित ठेवण्याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे.

बसस्थानके, रेल्वे स्थानक येथे जनजागृती संदेश देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लॉजिंग, रिसॉर्ट येथे येणाºया परराज्यातील, परदेशातील पर्यटक व्यक्तींची माहिती देण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संशयित रुग्णांची आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये या ठिकाणी गर्दी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम न घेण्यासाठी संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींमार्फत आठवडा बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजनेचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी व्यापक प्रसिद्धी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली
आहे. रुग्णांना उपचार देण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा व सामुग्री उपलब्ध आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व नोडल अधिकारी हे कोरोना आजाराबाबत माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय यंत्रणेद्वारे देण्यात येणाºया माहितीवर विश्वास ठेवावा. कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. सर्दी, खोकला या आजारांसाठी स्वत: उपचार न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करून स्वत:ची व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Health Corps Ready, Guardian Ministers Communicate with Officers About Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.