चिवला बीच किनाऱ्यावर मासळीचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:28 AM2019-08-20T11:28:53+5:302019-08-20T11:29:32+5:30
चिवला किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळ्यात कोळंबी व अन्य मासळीचा कॅच मिळाला.
मालवण : चिवला किनारी मणचेकर रापण संघाने लावलेल्या रापण जाळ्यात कोळंबी व अन्य मासळीचा कॅच मिळाला.
मोठ्या प्रमाणात कोळंबी मासळी मिळाल्याने चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या कोळंबी मासळीला किलोमागे होलसेल दर अपेक्षित असताना तो केवळ २२५ रुपये मिळाला. एकूण ३८० किलो कोळंबी मासळीची विक्री झाली.
छोटी कोळंबी खरेदी होत नसल्याने अल्प किमतीत काही शिल्लक टोपल्या विकल्या गेल्या. तर मिळालेली अन्य छोटी मासळीची विक्री होत नसल्याने ती किनाऱ्यावर ओतण्यात आली होती, अशी माहिती रापण संघाचे मिलिंद हिंदळेकर यांनी दिली.
रापण जाळ्यात मिळालेल्या खवळी, पेडवे या मासळीची फिशमील बंद असल्याने विक्री होत नव्हती. तर अन्य ग्राहकही नसल्याने मच्छिमारांनी मासळी किनाऱ्यावर ओतली होती. मासळीचे ढीग चिवला किनारी होते. त्यातील चांगली मासळी निवडून घरी नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.