आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी, 'म्हणून' सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 05:59 PM2022-02-05T17:59:46+5:302022-02-05T18:00:30+5:30

आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूरला आणण्याची शक्यता

Hearing on MLA Nitesh Rane's bail application postponed on Monday | आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी, 'म्हणून' सुनावणी पुढे ढकलली

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी, 'म्हणून' सुनावणी पुढे ढकलली

Next

ओरोस  : आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्याची मागणी केल्याने व यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने ही सुनावणी सोमवार (७ फेब्रूवारी) पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज दाखल करून घेत वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आ. राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई दुपारी न्यायालयात हजर झाले होते. 

परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी आ. राणे यांच्या वकिलांनी केली. 

त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच अपूर्ण दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत वेळ दिला आहे.

Web Title: Hearing on MLA Nitesh Rane's bail application postponed on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.