सिंधुदुर्गात उष्णतेची लाट; काजू वेचायला गेलेल्या महिलेचा बागेतच मृत्यू 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 10, 2024 03:12 PM2024-04-10T15:12:14+5:302024-04-10T15:12:41+5:30

दिनेश साटम शिरगांव : सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील स्मिता रघुनाथ पाष्टे ...

Heat wave in Sindhudurga; A woman who went to collect cashew nuts died in the garden | सिंधुदुर्गात उष्णतेची लाट; काजू वेचायला गेलेल्या महिलेचा बागेतच मृत्यू 

सिंधुदुर्गात उष्णतेची लाट; काजू वेचायला गेलेल्या महिलेचा बागेतच मृत्यू 

दिनेश साटम

शिरगांव : सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील स्मिता रघुनाथ पाष्टे (वय-६५) या बागेत काजू वेचण्यासाठी गेल्या असता उष्माघाताने बागेत त्या मृतावस्थेत आढळून आल्या. ही घटना शनिवारी (दि.६) घडली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेले काही दिवस उष्णतेचे लाट कायम आहे. तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मागील आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आगामी काळात नागरिकांनी अतिशय महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

Web Title: Heat wave in Sindhudurga; A woman who went to collect cashew nuts died in the garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.