येत्या चार तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

By सुधीर राणे | Published: June 28, 2023 12:48 PM2023-06-28T12:48:05+5:302023-06-28T12:48:30+5:30

जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

Heavy rain in Sindhudurg district in next four hours, alert warning | येत्या चार तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

येत्या चार तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

कणकवली : राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर जोरदार पावसाची वाट शेतकरी राजा पाहत होता. मात्र, शनिवारी जोराचा पाऊस झाल्यानंतर इतर दिवशी तुरळक सरीच कोसळत होत्या. मात्र, काल मंगळवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. 

दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत येत्या तीन-चार तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून  सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच सध्या भात शेतीच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे.

मुसळधार पावसाच्या अनुषंगाने नागरिकांना तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सलग आठवडाभर जोरदार पाऊस झाल्यास नदी, ओहोळामधील पाणी वाढणार आहे. पावसाने जोर धरल्याने नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे. 

मालवण तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.९ मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२८.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात)
देवगड ९८.४ (२९३.४), मालवण ११५ (३४४.४), सावंतवाडी १०७.५ (४३१.०), वेंगुर्ला ७३.० (२८४.७), कणकवली ६०.७ (२८४.३), कुडाळ ८९.५ (३४२.१), वैभववाडी ७३.० (२९३.७), दोडामार्ग ७४.८ (३६०.८) असा पाऊस झाला आहे.

Web Title: Heavy rain in Sindhudurg district in next four hours, alert warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.