सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:48 PM2017-08-29T16:48:02+5:302017-08-29T16:48:50+5:30

सिंधुदुर्गनगरी दि. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. सरासरी ३५.0५ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत जिल्ह्यात २३९७.९ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.

Heavy rain in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी दि. २९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. सरासरी ३५.0५ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत जिल्ह्यात २३९७.९ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.


चोवीस तासात झालेला तालुकानिहाय पाऊस


दोडामार्ग-१७, सावंतवाडी -१९, वेंगुर्ला-१८.४, कुडाळ -२८, मालवण -२८, कणकवली -४७, देवगड- ६४, वैभववाडी -५९.


देवघर पाणलोट क्षेत्रात ६७.४0 मि.मि. पाऊस


देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ६७.४0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत २७६२.२0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ८२.0६२0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.

तिल्लारी आंतराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २५.६0 मि.मी. एकूण पाऊस ३१६६ मि.मि. कार्ले-सातंडी ४९ मि.मि. एकूण पाऊस २४0५ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ४१२.0३१0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.
 

Web Title: Heavy rain in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.