ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 04:53 PM2017-11-21T16:53:25+5:302017-11-21T16:53:37+5:30

ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात आणि सह्याद्री पट्ट्यात सोमवारी दुपारी दमदार पाऊस पडला. हा अवकाळी पाऊस रब्बीसाठी लाभदायी ठरणार असला तरी मोहोरावरील काजू पिकाला नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.

Heavy rain in the Vaibhavwadi area with thunderstorms | ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात दमदार पाऊस

ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात दमदार पाऊस

Next

वैभववाडी : ढगांच्या गडगडाटासह वैभववाडी परिसरात आणि सह्याद्री पट्ट्यात सोमवारी दुपारी दमदार पाऊस पडला. हा अवकाळी पाऊस रब्बीसाठी लाभदायी ठरणार असला तरी मोहोरावरील काजू पिकाला नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.
रविवारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाची चिन्हे दिसत होती. सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाचा अचानक शिडकावा झाला. त्यानंतर ३.३० च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस सुरू झाला. सुमारे पाऊण तास पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. 
वैभववाडी तालुक्यात रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे. भुईमूग, कुळीथ, कलिंगड आदी पिके घेतली जातात. त्यांची लागण झाली असून हा पाऊस रब्बीसाठी लाभदायी ठरणारा आहे. परंतु, काही भागात काजूला मोहोर आला आहे. या अवकाळी पावसाने काजूचा मोहोर झडून शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Heavy rain in the Vaibhavwadi area with thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस