मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 07:31 PM2021-06-14T19:31:48+5:302021-06-14T19:32:48+5:30

Banda Rain Sindhudurg : मडुरा पंचक्रोशीतील गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.

Heavy rains disrupt life in Madura Panchkrushi | मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

पाडलोस : माडाचेगावळ पुलावर पाणी आले आहे. (छाया : अजित दळवी)

Next
ठळक मुद्देमाडाचेगावळ पुलावर पाणी मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

बांदा :मडुरा पंचक्रोशीतील गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.

मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शेर्ले कापई पूल पाण्याखाली गेले होते. तर मडुरा सातोसे मार्गावरील मडुरा माऊली मंदिर पुलावर पाणी आल्याने पंचक्रोशीतील चार गावांचा संपर्क तुटला. पाडलोस माडाचेगावळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला होता.|

बांदा शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी पुलावर पाणी आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मडुरा हनुमान मंदिर जवळील पुलही पाण्याखाली गेले होते. मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्याचा भरावही कोसळला. दांडेलीतील पुलावर पाणी आल्याने आरोस-दांडेली-न्हावेली मार्गे सावंतवाडी मार्ग वाहतुकीस काही काळ बंद झाला. ठिकठिकाणची केलेली भात पेरणी पाण्याखाली जाऊन कुजण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. धो धो कोसळणार्‍या पावसामुळे सर्व रस्त्यावर वाहनांची वर्दळ मात्र कमी होती.
 

Web Title: Heavy rains disrupt life in Madura Panchkrushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.