माणगांव खो-यात वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:15 PM2020-05-05T16:15:20+5:302020-05-05T16:18:44+5:30

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. माणगांव येथील धरणवाडी, बेनवाडी, आंबेरी येथे वादळामुळे अनेकांच्या घरांची छपरे व अंगणावरील पत्र्यांची शेड उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Heavy rains hit Mangaon valley | माणगांव खो-यात वादळी पावसाचा फटका

माणगांव खो-यात वादळी पावसाचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांच्या घरांची छपरे उडाली : लाखो रुपयांचे नुकसान; महसूलने केला पंचनामा

सावंतवाडी : माणगांव खो-यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळसदृश पावसामुळे अनेकांच्या घरांची छपरे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. माणगांव येथील धरणवाडी, बेनवाडी, आंबेरी येथे वादळामुळे अनेकांच्या घरांची छपरे व अंगणावरील पत्र्यांची शेड उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या वादळसदृश  पावसामुळे जगदीश धुरी, सावित्री धुरी, जयेश धारगळकर, रमजान शेख व अनुसया कदम यांच्या घरांचे छप्पर उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

माणगांव खोºयात धरणवाडी, बेनवाडी, आंबेरी या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वीज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रविवारपासून वीज गायब आहे. 

या  नुकसानीचा पंचनामा माणगाव तलाठी शेणवी व वाडोस तलाठी दळवी यांच्याकडून करण्यात आला. तसेच कालेली येथील नाना राऊळ यांच्या बागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा पंचनामा करण्यात आला.

 

 

Web Title: Heavy rains hit Mangaon valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.