rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:48 PM2022-06-10T16:48:22+5:302022-06-10T16:54:40+5:30

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

Heavy rains in Sindhudurg | rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

googlenewsNext

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस प्रतिक्षेत असलेल्या वरूणराजाने काल, गुरूवारी मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. आज, शुक्रवारी सकाळपासूनही पावसाची रिपरिप सुरू होती. हा मान्सून असल्याचे हवामान खात्याने अजून ही जाहीर केले नसले तरी १० जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून आता प्रतिक्षा संपली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस हजेरी लावतो. केरळ येथे हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाला होता. त्यानंतर तो जूनच्या २ ते ३ तारीख दरम्यान तो गोव्यात दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तो येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु केरळ नंतर तो गोव्यात दाखल झाला नाही. परिणामी १० जूननंतर तो महाराष्ट्रात दाखल होईल असे नवे भाकित करण्यात आले. त्या नव्या भाकिताप्रमाणे गुरूवारी ९ जून मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाऊस दाखल झाला आहे.

पावसाची रिपरिप

शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तर आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Heavy rains in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.