सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 19, 2024 04:26 PM2024-07-19T16:26:37+5:302024-07-19T16:27:11+5:30

शाळा, महाविद्यालये सोडली, एनडीआरएफची पथके तैनात

Heavy rains in Sindhudurga; Many roads under water, Oros Christianwadi again surrounded by floodwaters | सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

गिरीश परब

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. ओरोस येथे महामार्गालगत ख्रिश्चन वाडी येथील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथील लोकांना बचाव पथकाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी अनेक राज्य तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

आजच्या परिस्थितीमुळे शेकडो लोक बाधित झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केल्या १३ दिवसात जिल्ह्यात पूरस्थिती रविवार व्हायची ही तिसरी वेळ आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ११४.८ च्या सरासरीने पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे. 

गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यातील तेरेखोल व करली नदीने धोका पातळी ओलांडल्याने या नदी काठच्या गावांना कृषी विद्या धोका निर्माण झाला होता. तर अन्य गडनदी, तिलारी धोका पातळी वर पोहोचल्या होत्या. परिणामी या नद्यांच्या काठी असलेल्या गावांनाही पुराच धोका निर्माण झाला होता.

गुरुवारी रात्री महामार्गावरील बांदा येथे रस्त्यावर झाड पडून महामार्ग पडून काही काम हा मार्ग ठप्प झाला होता. आपत्ती व्यवस्थापनासाठी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील झाड बाजूला गेले त्यानंतर महामार्ग सुरळीत झाला. पुराचा सर्वाधिक जास्त फटका ओरोस ख्रिश्चन वाडी येथील घरांना बसला. पाण्याने घरांना चारी बाजूने वेडा दिल्यामुळे घरात अडकून बसलेल्या नागरिकांना बचाव पथकाने सुखरूप रित्या बाहेर काढले.

या मार्गावरील वाहतूक बंद

कुडाळ गुलमोहर हॉटेल येथे पाणी आल्याने वाहतूक आरएसएन हॉटेल मार्गे वळविण्यात आली होती. असगनी, आचरा मार्गावर पुलावर पाणी आल्याने कणकवली आचरा मार्ग वाहतुकीस बंद होता. या मार्गावरील वाहतूक बिडवाडी मार्गे वळविण्यात आली होती.

कणकवली सातसल, कासरल मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. अनाव  पणदूर मार्गावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद होतील. होडावडा तुळस मातोंड या मार्गावर पणी आल्याने याही मार्गावरील वाहतूक बंद होती .खाजगी शाळां बंद ठेवण्यात आल्या होत्या. कालांतराने पूर ओसरल्यानंतर या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

२४ तासात झालेला पाऊस 

गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ११४.८ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ११२.६ मिलिमीटर पाऊस, मालवण मध्ये १२८.९ सावंतवाडी मध्ये ७८.२ ,वेंगुर्ला मध्ये ९३.३ मिमी, कणकवली मध्ये सर्वाधिक १४७.३ मी मी पाऊस झाला, कुडाळ मध्ये १३० मीमी पाऊस, वैभववाडी मध्ये १२० दोडामार्ग मध्ये ७१.३ मिनी पाऊस झाला.

Web Title: Heavy rains in Sindhudurga; Many roads under water, Oros Christianwadi again surrounded by floodwaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.