सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 04:11 PM2022-07-14T16:11:08+5:302022-07-14T16:19:38+5:30

महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

heavy rains receded In Sindhudurg, most of the dams overflowed | सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो

Next

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पावसाचा जोर आता पूर्णपणे ओसरला आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४४ मिमी पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १६७४.४ मिमी पाऊस झाला आहे.

जून महिन्यात सरासरीने पिछाडलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात गतवर्षीची सरासरी मागे टाकून पुढे वाटचाल सुरू केली आहे. गेले आठवडाभर पडत असलेल्या संततधार पावसाने आता काही विश्रांती घेतली असली तरी असा पडणारा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणारा असल्याने बळीराजांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून, सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत. देवगड- २१.४ (१३९१.८), मालवण- ४७.६ (१५८७.२), सावंतवाडी- ४९.९ (१९९९.४), वेंगुर्ला- ६७.८ (१७३५.५), कणकवली- ४२.४ (१५२८.४), कुडाळ- ४०.२ (१८०१.२), वैभववाडी- ४६.९ (१७०६.६), दोडामार्ग- ४९.(१९०९.८) असा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे. सध्या कुठल्या नदीतील पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर नाही.

तिलारी धरणात ६ हजार ४० क्युसेक पाण्याचा विसर्ग

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६५.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३७७.२४६ दलघमी पाणीसाठा असून, धरण ८४.३३ टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण ६ हजार ४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Web Title: heavy rains receded In Sindhudurg, most of the dams overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.