सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 1, 2022 02:28 PM2022-10-01T14:28:05+5:302022-10-01T14:28:34+5:30

नवरात्रोत्सव सुरु असल्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.

Heavy rains started in Sindhudurg district, Farmers worried about rice harvest | सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, भात कापणी आल्याने शेतकरी चिंतेत

Next

कणकवली (सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या विविध भागात काल, शुक्रवार सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आज, शनिवारी सकाळी कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने काही भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. मागील काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक कापणीला आले असून कापणीच्या वेळी जर शेतामध्ये पाणी साचले तर हाता तोंडाशी आलेले भात पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान खात्याने १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पावसाने बरसायला सुरूवात केली आहे. नवरात्रोत्सव सुरु असल्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.

Web Title: Heavy rains started in Sindhudurg district, Farmers worried about rice harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.