स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:33 PM2020-02-10T16:33:55+5:302020-02-10T16:35:32+5:30

देवगडमधील पर्यटनस्थळांची भुरळ परदेशी पर्यटकांनाही पडली असून स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये दाखल झाले आहे. पर्यटनाची सुरुवात त्यांनी कुणकेश्वर, हिंंदळे, मोर्वे येथून केली आहे.

The helicopter landed in the temple; Look at the crowd | स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये

स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये

Next
ठळक मुद्देहेलिकॉप्टर देवगडात उतरले; बघ्यांची गर्दीस्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क देवगडमध्ये

देवगड : देवगडमधील पर्यटनस्थळांची भुरळ परदेशी पर्यटकांनाही पडली असून स्वित्झर्लंडमधील पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये दाखल झाले आहे. पर्यटनाची सुरुवात त्यांनी कुणकेश्वर, हिंंदळे, मोर्वे येथून केली आहे.

पर्यटन हंगाम पावसामुळे लांबला. हंगामाच्या सुरुवातीलाच परदेशी पर्यटकांनी देवगडमध्ये हजेरी लावली. त्यांनी चक्क सायकल सफर करून कोकण, गोवा पर्यटन केले.
शनिवारी दुपारी २.३० वाजता स्वित्झर्लंडहून पाच स्वीस पर्यटक चक्क हेलिकॉप्टरने देवगडमध्ये दाखल झाले. जामसंडे येथील सांस्कृतिक भवनसमोरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर अचानक उतरल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

तिथे उतरल्याबरोबर ते चारचाकीने देवगड तालुका पर्यटन भ्रमंतीसाठी रवाना झाले. विदेशी पर्यटकांनीही विजयदुर्ग व कुणकेश्वरला जास्त पसंती दिली असून याबरोबरच देवगडमधील इतर पर्यटनस्ळांचा आस्वाद घेत आहेत. चक्क हेलिकॉप्टरने दाखल झालेल्या स्वीस पर्यटकांमुळे देवगडमध्ये मात्र हवाई पर्यटनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Web Title: The helicopter landed in the temple; Look at the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.