फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 04:54 PM2021-08-05T16:54:23+5:302021-08-05T17:00:16+5:30

Flood Bjp NiteshRane Sindhudurg : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Help the flood victims like the Fadnavis government | फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा

फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा

Next
ठळक मुद्देफडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करानितेश राणे यांची आघाडी सरकारकडे मागणी

कणकवली : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

त्याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजमधून संकटग्रस्तांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे.

आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी , पुनर्वसनासाठी आहेत. ७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत मिळण्यापूर्वी तत्काळ संकटग्रस्तांना तातडीने रोख मदतीची गरज आहे.

३१ ऑगस्ट २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता त्याप्रमाणे मदत देणार असे आघाडी सरकारने जाहीर केले होते. मात्र,या मदतीमध्येही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते आहे. फडणवीस सरकारने नुकसानीचे पंचनामे होण्याआधी पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन ५ हजार रुपयांची रोख मदत पोहचविली होती. तसेच संकटग्रस्तांच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले होते.

अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्यांची घरे राहण्या योग्य राहिली नव्हती अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एक रकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती अशांना ९५ हजार १०० रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते, अशी भरघोस मदत आघाडी सरकारने द्यावी.

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीपेक्षा कमी मदत आघाडी सरकारने दिली आहे. जाहीर केलेल्या मदतीच्या मोठ्या आकड्यांचे ढोल वाजवण्याऐवजी आघाडी सरकारने मदत पोहचविण्याची प्रक्रिया गतिमान करावी.असेही या पत्रकात म्हटले आहे.

 

Web Title: Help the flood victims like the Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.