सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुक अर्ज भरण्यासाठी प्रत्येक तहसिलमध्ये मदत कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:31 PM2017-09-27T13:31:11+5:302017-09-27T13:31:20+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३२५ ग्रामपंचायतींसाठी होणाºया निवडणुकीसाठी आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्यात येणाºया तांत्रिक अडचणींसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३२५ ग्रामपंचायतींसाठी होणाºया निवडणुकीसाठी आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्यात येणाºया तांत्रिक अडचणींसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्रानुसार दिनांक १ सप्टेंबर व दिनांक १२ सप्टेंबर २0१७ नुसार डिसेंबर २0१७ मध्ये मुदती संपणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणुक जाहीर झाली आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीमध्ये उमेदवारांनी आॅनलाईन भरलेली नामनिर्देशनपत्रे सकाळी ११ ते सायं ४.३0 या वेळेत संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत.
या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांमध्येही आॅनलाईन काम सुरु असल्याने (pamchayatelection.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावरील काम मंदगतीने सुरु आहे. तथापि दिनांक २७ सप्टेंबर २0१७ पासून या संकेतस्थळावरील कामाची गती वाढेल अशी अपेक्षा राज्य निवडणुक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर असून यादिवशी संकेतस्थळाचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन भरलेलीच नामनिर्देशनपत्र स्विकारण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या असल्याने इच्छुक उमेदवारांनी अंतिम दिनाकांपूर्वी लवकरात लवकर नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरुन ते संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत दाखल करावे.
संबंधित संकेतस्थळ हे दिवसाचे २४ तासही सुरु असल्याने इच्छुक उमदवारांना कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरल्यास संकेतस्थळावरील भार कमी असल्याने त्यावेळी नामनिर्देशन आॅनलाईन भरण्याची प्रक्रीया वेगाने होवू शकते.
आॅनलाईन भरलेले नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायं ४.३0 वाजेपर्यंत असून या दिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरुन झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सकाळी ११ ते सायं ४ या वेळेत दाखल करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये एक मदत कक्ष तयार करण्यात आलेले आहे. त्याचा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देनपत्र भरताना काही तांत्रिक अडचण उद्धभवल्यास त्यांनी त्यांच्या तालुकानिहाय क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.