औषधी वनस्पती प्रकल्प सुरू करणार
By admin | Published: June 17, 2016 10:05 PM2016-06-17T22:05:38+5:302016-06-17T23:32:53+5:30
प्रमोद जठार : तुळस येथील कृषी पर्यटन शिबिरात प्रतिपादन
वेंगुर्ले : कृषी पर्यटनाला चालना व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व कोकण कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने वेंगुर्ल्यामध्ये औषधी वनस्पती लागवडीचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येत असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष व कोकण कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद जठार यांनी तुळस येथे केले.
तुळस येथील सिद्धिमंगल कार्यालयात १५ जूनला वेंगुर्ले तालुका भाजप व कोकण कृषी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, महिला तालुकाध्यक्षा मनाली करलकर, कृषी समितीचे तालुकाध्यक्ष सचिन दळवी, नगरसेविका अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, अनुभव मांजरेकर, अरविंद बिराजदार उपस्थित होते.
या कृषी मार्गदर्शन शिबिराला
बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्र्रामस्थ तसेच कीर्तीमंगल भगत, संदीप पाटील, व्ही. पी. देसाई, जे. वाय. नाईक, आर. व्ही. नाईक, रवी शिरसाठ यांच्यासह कार्यकर्ते व सुमारे २00 लाभार्थी उपस्थित होते. बाळू देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)