खेडमध्ये हायटेक शिक्षण
By admin | Published: January 19, 2015 11:18 PM2015-01-19T23:18:24+5:302015-01-20T00:08:54+5:30
जिल्हा परिषद : दोन वर्षांच्या प्रयोगाला मिळतेय शाळाशाळांमधून यश
श्रीकांत चाळके-खेड -हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेने भर दिला आहे. प्राथमिक पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर पडावी, हा यामागचा हेतू आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, आता अशा शाळांची संख्या कमी झाल्याने खेड तालुक्यातील संगणक असलेल्या ८३ शाळांना याचा लाभ झाला आहे़
खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत़ त्यातील ८५ प्राथमिक शाळांमधील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम हाती घेतली होती़ त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकले़ त्यापाठोपाठ आजच्या गतिमान शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्र्थ्यांना ओढण्यासाठी जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणक उपलब्ध करून दिले गेले. मात्र, वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे त्याचा लाभ शाळांना मिळत होता. शासनाकडून मिळणाऱ्या ४ टक्के सादील निधीतून आवश्यक सुविधा मिळत होत्या. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसह विविध बिलेही थकली आहेत़ ४ टक्के सादील योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतूनच ही बिले भरली जातात. मात्र, हा निधी न मिळाल्याने बिले भरलेली नाहीत़
वीजबिलांना वाणिज्य दर लावण्यात आल्याने ती भरणेही ग्रामस्थांना अशक्य झाले़ त्यामुळें गेल्या दोन वर्षात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. खेड तालुक्यातील अल्प शाळांमध्ये आता वीजबिले न भरण्याचे प्रमाण राहिले. मात्र, आता या तालुक्यातील शाळांमध्ये पुन्हा हायटेकपध्दतीने शिक्षण देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. अशा शाळांमध्ये नवनवीन प्रयोग सादर करण्यास तेथील शिक्षक, पालक सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात येते.
बिले वाणिज्य दराने नाही...
वीज जोडण्या तोडल्यानंतर पुन्हा जोडल्या.
प्राथमिक शाळांमध्ये संगणक शिक्षण.
शाळांची बिले न भरल्याने संगणक प्रणालीवर झाला होता परिणाम.
वाणिज्य दराने शाळांची बिले तयार झाल्याने ती भरणे ग्रामस्थानाही अशक्य.
आता सुकर
खेड तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानामधून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, मधल्या काळात वीजबिल न भरल्याने शाळा हायटेक करण्याला थोडा ब्रेक लागला होता.