महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात पण धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:00 PM2020-02-25T15:00:27+5:302020-02-25T15:01:22+5:30
कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.
कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. तेथून वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. तर सर्व्हिस रोडशेजारी गटार बांधकाम केले जात आहे. त्यामुळे मातीचे खोदकामही होत आहे. याचा परिणाम वातावरणावर होत असून धुळीचे प्रमाण वाढले आहे.
अनेकवेळा या धुळीमुळे अपघात होत आहेत. धुळीमुळे काहीवेळा वाहन चालकांना दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास करावा लागतो. भरावाचे काम सुरू असताना धुरळा उडू नये, म्हणून ठेकेदार कंपनीकडून मातीवर पाणी मारणे गरजेचे आहे. काहीवेळा शहरात सर्व्हिस रस्त्यावर पाणी मारले जाते. पण त्यामुळे चिखल झाल्याने वाहने तसेच पादचारी घसरण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यकती सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तसेच लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महामार्गाच्या जवळ असलेले दुकान व घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारीही हैराण झाले आहेत. महामार्गाच्या दोन्ही सर्व्हिस रोडवरून गटाराचे काम सुरु असल्याने वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. धुळीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने अनेक नोकरदार व्यक्तींना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कणकवली शहरातील उडणाऱ्या धुरळ्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरातील चौपदरीकरण कामामुळे प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.