महामार्ग रोखला : आदेशाने कुडाळात भातखरेदी

By admin | Published: May 28, 2015 12:07 AM2015-05-28T00:07:55+5:302015-05-28T00:57:46+5:30

भात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही

Highway stop | महामार्ग रोखला : आदेशाने कुडाळात भातखरेदी

महामार्ग रोखला : आदेशाने कुडाळात भातखरेदी

Next

कणकवली : भात गोदामे खाली करण्यासाठी कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. कणकवलीत आमदार नीतेश राणे यांनी स्वत: आंदोलनात सहभाग घेतला. कणकवलीत राष्ट्रीय महामार्ग आणि बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावर रास्तारोको करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार राणे यांच्यासह जिल्हाभरातून एकूण ९७ कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीने कुडाळ येथे गोदामातील भात खरेदी केली. आंदोलनाचा परिणाम म्हणून भात खरेदी सुरू झाल्याचा दावा कॉँग्रेसने केला.
कणकवलीत आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर बांदा येथे तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कणकवलीत ७२ कार्यकर्त्यांना तर बांद्यात २५ जणांना अटक केली. यापुढे कोकणातील जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी धमकी दिली तर महाराष्ट्रात त्यांना कुठेही फिरू देणार नाही. त्यामुळे त्यांनी येथील जनतेबद्दल बोलताना विचार करूनच बोलावे, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. या आंदोलनामुळे येथे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांची यामुळे दमछाक झाली.गाडी पेटवलीभात गोदामासमोर आंदोलन सुरू असताना तेथूनच काही अंतरावर महामार्गावर एमएच ०४, ए- ९१९७ या क्रमांकाची मारूती कार अज्ञातांनी पेटवली.
त्यामुळे आगीच्या भडक्याबरोबरच धुराचे लोळ पसरले होते. टायरनी पेट घेतल्याने बराचवेळ गाडी पेटत होती. मात्र हे कृत्य कोणी केले? हे समजू शकले नाही.


तहसीलदारांशी चर्चा
भात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही, असे तहसीलदारांनी सांगितले.
पोलीस महानिरीक्षक सावंतवाडीत काँग्रेसच्यावतीने आमदार नीतेश राणे यांनी ‘सिंधुदुर्ग गोदाम खाली’ आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे बुधवारी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. त्यांनी काहीवेळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात थांबून ते ओरोसकडे गेले.

वनविभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको
पोलीस आंदोलकांना कणकवली पोलीस स्थानकात घेऊन जात असताना वनविभागाच्या कार्यालयासमोरील महामार्गावर काही आंदोलक तसेच शेतकऱ्यांनी भाताची पोती ठेवून रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. ही पोती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस मोकळा करण्यात आला. तसेच आंदोलकांना पोलीस स्थानकात आणण्यात आले.

Web Title: Highway stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.