वडिलांचा मृतदेह कोंडून ठेवला

By admin | Published: June 20, 2014 12:11 AM2014-06-20T00:11:11+5:302014-06-20T00:15:11+5:30

मळगाव येथील घटना : सात दिवसांनी प्रकार उजेडात

His father's body was restrained | वडिलांचा मृतदेह कोंडून ठेवला

वडिलांचा मृतदेह कोंडून ठेवला

Next

सावंतवाडी : मळगाव-आजगावकरवाडी येथे एका घरात कुजलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह आढळून आला. वसंत बाळकृष्ण वालावलकर (वय ७५) या वृद्धाचा आठवड्यापूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता, पण त्याच्या वेडसर मुलगा व मुलगीने हा मृतदेह खोलीत कोंडून ठेवला. अखेर हा प्रकार सात दिवसांनी विवाहित मुलीमुळे उघड झाला. या घटनेमुळे मळगाव गावात एकच खळबळ उडाली आहे.
मळगाव-आजगावकरवाडीत वसंत बाळकृष्ण वालावलकर हे आपला मुलगा व तीन मुलींसह राहत होते. त्यातील एका मुलीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पत्नीचाही मृत्यू झाला होता, तर एका मुलीचा विवाह झाला आहे. मुलगा रमाकांत वसंत वालावलकर व मुलगी शांती वसंत वालावलकर हे दोघेजण वडिलांसह आजगावकरवाडीतील घरात राहत होते.
मात्र, गेले काही दिवस वसंत वालावलकर हे अस्थमाच्या आजारपणामुळे त्रस्त होते. त्यातच १२ जूनला मळगाव बाजारात जाताना ते अनेकांना दिसले होते. सायंकाळी घरी गेल्यानंतर मात्र ते कोणालाही दिसले नाहीत. याच कालावधीत ते सकाळच्या सुमारास तोंड धुण्यासाठी आले असता अंगणात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा व मुलगीने त्यांचा मृतदेह घरातील एका खोलीत कुलूपबंद करून ठेवला होता. काही दिवसांपूर्वीच वालावलकर यांनी घराशेजारची झाडे तोडून विकली होती. ती झाडे विकून मिळालेल्या पैशांतून त्यांना घर बांधायचे होते. त्यामुळे लाकडाचा व्यापारी पैसे देण्यासाठी त्यांची शोधाशोध करीत आला होता. यावेळी वालावलकर कुठे दिसत नाहीत, असे शेजाऱ्यांना सांगितल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. वालावलकरांच्या शोधासाठी सावंतवाडीतील त्यांचे नातेवाईक गोसावी यांनी वालावलकरांच्या गोवा, तसेच अन्य ठिकाणच्या नातेवाइकांना फोन करून चौकशी केली. मात्र, ते कुठेही नसल्याचे समजले. अखेर त्यांच्या साळगाव येथील विवाहित मुलीला बोलावून घेण्यात आले.
साळगाव येथील मुलगी मळगाव येथील घरी आली असता तिला घरातून कुजलेला वास आला. यावेळी तिने भाऊ रमाकांतला खोली उघडण्यास सांगितले. मात्र, त्याने खोली उघडण्यास मज्जाव केला. त्यामुळे याबाबत सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, उपनिरीक्षक दाजी वारंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोस्कर, संजय हुबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलगा रमाकांतने पोलिसांसमक्ष खोली उघडली असता वालावलकर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह अन्यत्र हलविण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदनही केले. या प्रकरणी मृत वसंत वालावलकर यांची मुलगी पुष्पलता वालावलकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, मृतदेह ठेवण्यामागच्या कारणाचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: His father's body was restrained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.