जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व : सुरेश प्रभू

By admin | Published: July 6, 2017 04:32 PM2017-07-06T16:32:07+5:302017-07-06T16:32:07+5:30

सिंधुदुर्गात जीएसटी व मुद्रा योजना कार्यशाळेला प्रतिसाद

Historical Festivals of GST: Suresh Prabhu | जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व : सुरेश प्रभू

जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व : सुरेश प्रभू

Next


आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. 0६ : जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व सुरु झाले आहे. कर प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करत सर्वसामान्य व्यापा-यापासून नागरिकांना दिलासा देत सरकारने सुविधा निर्माण केली आहे. पायाभूत सुविधांचा विकासासाठी, बेरोजगारी कमी करणे व उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या या जीएसटी करप्रणालीमुळे सर्वांचे जीवन सुसह्य होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे आयोजित जीएसटी व मुद्रा योजना कार्यशाळेत व्यक्त केले.

येथील नवीन नियोजन समिती सभागृहात आज जीएसटी व मुद्रा योजना संदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य आयुक्त के. पी. एस. सुरी, श्री. सुरेंद्र मानकोसकर, व्ही. एम. शेटे, के. के. श्रीवास्तव, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, आयुक्त प्रशांत साळे, रविराज जाधव, माजी आमदार सर्वश्री राजन तेली, अजित गोगटे, प्रमोद जठार व संदेश पारकर उपस्थित होते.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जीएसटी व मुद्रा योजनेसंदभार्तील सिंधुदुर्गची परिस्थिती आढावा घेतला यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, केंद्र सरकारने १ जुलै पासून करप्रणाली मध्ये आमुलाग्र बदल केले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालात जीएसटीचा उगम झाला त्यानंतर युती सरकारच्या कालावधीत यावर चर्चा झाली मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला.

राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वेगवेगळ्या करांमुळे सर्व सामान्य लोकांना कर भरण्यास अडचणी होत्या कर द्यायला लोक तयार होते. मात्र पध्दत चुकीची होती. म्हणूनच सर्व सामान्य माणसाची अडचण दूर करण्यासाठी प्रथमच सर्व राज्य व केंद्र सरकारनी जीएसटी कौन्सील निर्माण केले आणि या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली.


भारतात अद्याप बेरोजगारीचा प्रश्न आहे. काही ठिकाणी गरीबी आहे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, उद्योग निर्माण करणे, नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणे यासाठी गुंतवणुकीची आवश्यता असते. ही गुंतवणूक खासगी क्षेत्रातून केली जात नाही. त्यासाठी या जीएसटी निधीचा वापर केला जाणार आहे. सरकारचे उत्पन्न व त्यांची खर्च करण्याची क्षमता यामध्ये तफावत असल्याने या करामधून जे पैसे मिळणार त्यातून विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

सिंधुदुर्गातील नागरिक हे प्रामाणिकपणे टॅक्स देणारे आहेत. येथे उद्योजकता निर्माण करण्यासाठी जीएसटीची आवश्यकता आहे. टॅक्स भरण्याचे सामाजिक व राजकीय वातावरण देशात नव्हते मात्र आता जीएसटी संदर्भात ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रभू यांनी यावेळी जिल्ह्यातील वकील, चार्टर्ड अकौटंट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रतिनिधी व अधिकारी यांची एक स्थायी समिती स्थापन करण्याची सूचना केली. या समितीच्या बैठका दर महिना घेऊन लोकांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांना सुकर होण्यासाठी सुरु केलेल्या करप्रणालीचे आकलन करुन सुविधा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विक्रीकर सहाआयुक्त रविराज जाधव यांनी सिंधुदुगार्तील करदात्यांची माहिती दिली.

यावेळी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी जीएसटी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच उपस्थित करदात्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील उद्योजक विक्रेते, दुकानदार, औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Historical Festivals of GST: Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.