महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:36 PM2020-11-20T19:36:37+5:302020-11-20T19:38:32+5:30

mahavitran, kudal, bjp, sindhudurgnews कोरोना काळातील वीजबिल तसेच वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे पदाधिकारी व पोलीस यांच्यात झटापट झाल्याने वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

Hit on MSEDCL office, loud shouting | महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी

विनोद पाटील यांना राजन तेली यांनी निवेदन दिले. यावेळी रणजित देसाई, राजू राऊळ, बाळू देसाई, अस्मिता बांदेकर तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजीकुडाळात पोलीस, भाजप पदाधिकाऱ्यांत झटापट

कुडाळ : कोरोना काळातील वीजबिल तसेच वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे पदाधिकारी व पोलीस यांच्यात झटापट झाल्याने वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिवाळीपूर्वी घोषणा केली की, दिवाळीपर्यंत वीज बिल माफ होईल. पण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी निर्णय दिला की वीज बिल माफी महावितरणला देणे शक्य होणार नाही. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात व वीजबिल माफीची मागणी करण्यासाठी जिल्हा भाजपाने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी केली.

हे आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, राजू राऊळ, बाळू देसाई, दीपक नारकर, भाई सावंत, राकेश कांदे, अविनाश पराडकर, अस्मिता बांदेकर, मोहन सावंत, ॲड. बंड्या मांडकुलकर, संजय वेंगुर्लेकर, किशोर मर्गज, अभय परब, गोपाळ हरमलकर, पप्या तवटे, आरती पाटील, धोंडी चिंदरकर, संदीप मेस्त्री, राजा धुरी, राजेश पडते, संदेश नाईक, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर, आश्विन गावडे, सुनील बांदेकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राजन तेली व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना धारेवर धरले. तेली म्हणाले, कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या तीन ते चार महिन्यांतील लॉकडाऊनमुळे सर्व जनता या काळात घरी होती. कोणाच्याही हाताला काम नव्हते. अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय ठप्प झाले अशावेळी पैशाची आवक बंद झाल्यामुळे एकदम आलेले तीन महिन्यांचे वीज बिल भरण्याची आर्थिक ताकद बऱ्याच वीज ग्राहकांची नाही. त्यामुळे अनेक राज्यात वीज बिल माफ करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात वीज बिल माफी का नाही? आता जनतेने काय करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत येथील जनता वाढीव वीज बील भरणार नाही, तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेकडून वीज बिल वसुलीची सक्ती करू नये, असेही ते म्हणाले.

यावेळी विनोद पाटील यांनी किमान सव्वा महिना तरी कोणत्याही ग्राहकाला वीज बिलाची सक्ती करणार नाही. यानंतर प्रशासनाच्या आदेशानुसार बिल वसुली केली जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. या आंदोलना दरम्यान वीज बिलाची होळी करणाच्या प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना रोखताना पोलीस व पदाधिकारी यांची चांगलीच झटापट झाली. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग बनले.

आंदोलन छेडल्याप्रकरणी राजन तेली, समीधा नाईक, रणजित देसाई, ओंकार तेली, संध्या तेरसे यांच्यासह ३५ जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.
 

Web Title: Hit on MSEDCL office, loud shouting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.