मटका घेणारे तेराजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:33 PM2017-08-03T23:33:45+5:302017-08-03T23:33:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी अवैध धद्यांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. त्यांच्या विशेष पथकाने सलग दुसºया दिवशी मटका अड्डयांवर छापे टाकून लाखोंच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कणकवली शहर तसेच खारेपाटण येथील मटका सेंटरवर केलेल्या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तर पाच दुचाकी, रोख रक्कम व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत
माहिती देण्यात आली नव्हती.
उशिरापर्यंत कारवाई सुरु असल्याने शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षकानी कारवाई सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेष पथक नेमून त्यांनी ठिकठिकाणी धाड सत्र अवलंबिले आहे. गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरात धडक कारवाई करीत मटका घेणाºया १३ जणांना ताब्यात घेतले.
यामध्ये आनंद गणपत आचरेकर (५२), दशरथ रामू पवार (३२), रामचंद्र भाऊ चिंदरकर (५१, सर्व राहणार कलमठ- गावडेवाडी), मधुकर दिगंबर परब (५७), रानोजी विठ्ठल वाघमारे (२२), पुंडलिक सिद्धप्पा पाटील (२९), शहाणू भिल्लानसिध्द वाघमोडे (२९, सर्व राहणार कणकवली - टेंबवाडी), उमेश पांडुरंग जावडेकर (३६, कणकवली - जळकेवाडी), राकेश गोपीचंद नाडकर्णी (४२, राहणार कलमठ - बिडयेवाडी), चंद्र्रकांत शंकर गवाणकर (४९, राहणार कणकवली- बांधकरवाडी), तुषार यशवंत जाधव (३४, राहणार वागदे - गावठणवाडी) यांचा समावेश आहे.