Holi 2018 : सिंधुदुर्ग : आचरा येथे संस्थानकालीन गावहोळी, पारंपरिक पद्धतीने रोंबाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:33 PM2018-03-03T20:33:58+5:302018-03-03T20:33:58+5:30
आचरा गावच्या संस्थानकालीन होळी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. आचरा गावच्या शेजारील वायंगणी गावातून होळीसाठी फोफळीचे झाड वाजतगाजत आणत रामेश्वर मंदिराच्या शेजारी उभारुन होळदेवाची पूजा मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. शुक्रवारी सकाळी गावहोळीची पूजा करत विविध विशिष्ट चालीची गीते म्हणत पारंपरिक पद्धतीने रोंबाट काढण्यात आले. आचरा गावचा होळी उत्सव हा पाच दिवस चालणार आहे.
आचरा : आचरा गावच्या संस्थानकालीन होळी उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. आचरा गावच्या शेजारील वायंगणी गावातून होळीसाठी फोफळीचे झाड वाजतगाजत आणत रामेश्वर मंदिराच्या शेजारी उभारुन होळदेवाची पूजा मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. शुक्रवारी सकाळी गावहोळीची पूजा करत विविध विशिष्ट चालीची गीते म्हणत पारंपरिक पद्धतीने रोंबाट काढण्यात आले. आचरा गावचा होळी उत्सव हा पाच दिवस चालणार आहे.
पाच दिवसांच्या कालावधीत रामेश्वर मंदिराच्या शेजारील रवळनाथ मंदिरात विविध पारंपरिक कार्यक्रम साजरे होतात. यावेळी गावातील काही व्यक्तींची सोंगेही आणली जातात. पूर्वांपार चालत आलेला हा होळी उत्सव त्याच पद्धतीने साजरा होतो. धुलीवंदनाच्या दिवशी गावहोळीची पूजा करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी श्रीफळ ठेऊन होळदेवाकडे आर्शिवचन घेतले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत रोंबाट निघाले होते.
आचरे गावात होळी उत्सव ५ दिवस साजरा केला जातो. या काळात आचरा गावातील बाल, तरुण तसेच ज्येष्ठ कलाकारही विविध सोंगे, खेळ काढत घरोघरी फिरत करमणूक करतात. या पाच दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता रामेश्वर मंदिरात पाचव्या दिवशी रात्री गावातील विविध प्रसंग, घडलेल्या घटना व व्यक्तिंची हुबेहुब सोंगे काढत केली जाते.