महिला कबड्डी स्पर्धेत होलिक्रॉस सावंतवाडी विजेता

By admin | Published: April 6, 2016 09:59 PM2016-04-06T21:59:40+5:302016-04-06T23:52:03+5:30

जिल्हास्तरीय निमंत्रित संघ : वक्रतुंड पणदूर दुसऱ्या, तर जामसंडे सन्मित्र मंडळ तिसऱ्या स्थानी

Hollrons Sawantwadi winners in Women's Kabaddi Tournament | महिला कबड्डी स्पर्धेत होलिक्रॉस सावंतवाडी विजेता

महिला कबड्डी स्पर्धेत होलिक्रॉस सावंतवाडी विजेता

Next

वेंगुर्ले : श्री देवी सातेरी महिला मंडळ, तुळस आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वक्रतुंड पणदूर संघाला एकहाती धूळ चारत ३६-१४ गुणांच्या फरकाने होलिक्रॉस सावंतवाडी संघ विजेता ठरला. स्पर्धेत जिल्ह्यातील १४ संघांनी सहभाग घेतला.पहिल्या उपांत्य सामन्यात ९-८ गुणांच्या फरकाने होलिक्रॉस सावंतवाडी संघाने रोमहर्षक सामन्यात देवगड संघावर एका गुणाने मात करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या होलिक्रॉस सावंतवाडी संघाला नवोदित देवगड संघाने अक्षरश: जेरीस आणले होते. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ३३-२१ गुण फरकाने वक्रतुंड पणदूर संघाने अटतटीच्या लढतीत पाट हायस्कूल संघावर १२ गुणांनी विजय प्राप्त केला. व अंतिम सामन्यात धडक मारली. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून स्नेहा तिळवे, उत्कृष्ट चढाईपटू म्हणून प्रतिज्ञा कोचरेकर, उत्कृष्ट पकड म्हणून मनीषा पुजारे यांची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्लेचे पोलिस उपनिरीक्षक लायकर यांनी केले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सुजाता पडवळ, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण, तुळस गावचे सरपंच संदीप पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्या योगिता परब, गावचे पोलीसपाटील प्रकाश तुळसकर, फेडरेशनचे सहकार्यवाह तुषार साळगावकर, मंडळाच्या उपाध्यक्षा रत्नमाला तुळसकर, सचिव श्रद्धा गोरे, खजिनदार गौरी तुळसकर, सदस्या भाग्यलक्ष्मी घारे, संजीवनी तुळसकर, अनुराधा तुळसकर उपस्थित होते. जिल्ह्यात स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याचा श्री देवी सातेरी महिला मंडळाने जिल्ह्यातील पहिलाच मान मिळविल्याबद्दल फेडरेशनच्यावतीने दिनेश चव्हाण यांनी मंडळाचे कौतुक केले. पंच म्हणून फेडरेशनचे खजिनदार मार्टिन आल्मेडा, सचिव शैलेश नाईक, सदस्य लिविशा नाईक, राज्य पंच नंदकुमार नाईक, चंदक्रांत नाईक, दाजी रेडकर यांनी काम पाहिले. संयोजन वेताळ प्रतिष्ठान तुळस तसेच श्री प्रथमेश सावंत, भगवान चव्हाण व सर्व जैतीर तुळस संघाच्या खेळाडूंचे आयोजक व फेडरेशनच्यावतीने विशेष कौतुक करण्यात आले. सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Hollrons Sawantwadi winners in Women's Kabaddi Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.